• newsatarapoly@gmail.com

Chairman Message

Chairman Mesaage

अध्यक्षांचे मनोगत

सन्माननीय पालक बंधु भगिनी

सप्रेम नमस्कार


न्यु सातारा समुहाची स्थापना सामाजिक व समाजाभिमुख कार्य करण्यासाठी सन २000 साली करण्यात आली . यामध्ये अनेक समाजाभिमुख कार्य करण्याच्या उदात्त हेतुने सर्व विश्‍वस्त मंडळाने एकत्र येऊन न्यु सातारा समुहाची स्थापना केली

यामध्ये समुहाच्या माध्यमातुन ह . भ . प बाबा महाराज सातारकर यांच्या अमृत वाणीतुन अखंड हरिनाम सप्ताह न्यु सातारा वेल्फेअर सेंटर तर्फे अल्पदरात रूग्णवाहिका मुंबई ते पंढरपुर आषाढी कार्तिकी वारी निसर्गाचे संतुलन राखण्यासाठी वृक्षारोपन रक्‍तदान शिबीर संस्कृतीचा वारसा जपण्यासाठी सहकार दही हंडी महीलासाठी हळदिळुंकू समारंभ लोककला महोत्सव कल्याण येथे आदिवासी मुलांसाठी विद्यामंदीर शाळा पदमश्री शाहीर साबळे प्रतिष्ठान व्यवस्थापन व भाकड गायी संगोपनासाठी अख्णोदय जीवदया गोपालन एकसर युवकांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी भजन स्पर्धा विद्यार्थ्यासाठी शाहीर साबळे पुस्तक पेढी मोफत आरोग्य तपासणी शिबीर व अल्पदरात चष्मा वाटप ईत्यादी अनेक समाजाभिमुख कार्ये समुहामार्फत केली जातात


|| देव गुज सांगे पंढरीशी यारे प्रेमे चित्ती घ्यारे नाम माझे ||

|| आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगतसे गुज पांडुरंग ||


श्री रूविसणी प्राण संजीवन भगवान श्री विठ्ठल नगरी मध्ये म्हणजेच अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत पांडुरंगाच्या चरणी वारकरी बंधु आणि भगीनींची वारी काळात राहण्याची गैरसोय लक्षात घेऊन सर्व वारकरी बंधु भगीनींच्या निवासाची सोय व्हावी म्हणुन न्यु सातारा भक्तनिवास संकुलाची उभारणी करून त्यामध्ये प्रत्येक वर्षी हजारो भावीकांना अत्यल्प दरामध्ये राहणे खाणे किर्तन प्रवचन याचा लाभ तमाम महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील भावीकांनी घेतला व घेत आहेत . कोणतेही कार्य सुरू करणे सोपे असत मात्र त्यामध्ये सातत्य राखणे अतिशय महत्वाचे असते . श्री पांडुरंगाच्या आशीर्वादाने आजही आषाढी कार्तीकी चैत्री वारी व माघी वारी मध्ये याचा लाभ वारकरी बंधु घेत आहेत .


जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोचि साधु ओळखावा देव तेथेचि जाणावा या संत ऊक्ती प्रमाणे श्री क्षेत्र पंढरपुर च्या आजुबाजुच्या परिसराचा आढावा घेत असताना असे निदर्श नास आले कि या परिसरामध्ये ग्रामीण भागातील शेतकरी राजाच्या मुला मुलींना तंत्र शिक्षणाकरीता एखादे शैक्षणिक दालन उभारावे व त्यातुन या गरीब व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे तंत्रशिक्षण मिळावे या उदात्त हेतुने श्री क्षेत्र पंढरपुर पासुन पाच सहा कि मी च्या अंतरावर श्री सिदधेश्‍वर महादेवाच्या आश्रयाला मु पो कोर्टी पंढरपुर येथे शेक्षणिक दालन सुरू करण्याची मुहर्त मेढ रोवली.


याची सुरूवात सन २00९ या शैक्षणिक वर्षात न्यु सातारा कॉलेज ऑफ बी सी ए ची नोंदणी अहिल्याबाई होळकर सोलापुर विद्यापिठ सोलापुर येथुन परवानगी मिळाली आणि या कार्याला प्रारंभ झाला . तमसो मा ज्योतिर्गमय या संत वचनाप्रमाणे अज्ञानाकडुन प्रकाशाकडे जाण्याच्या कार्याची सुरूवात झाली . तसं पहाता संकटं आपणाला सावध करतात आणि सुख आपणास बेसावध ठेवते अंधारी रात्र आपल्याला सुंदर सुर्योदयाकडे घेऊन जाते तर अप्रतीम सुर्यास्त आपल्याला अंधाराकडे वाटचाल करायला लावतो पुन्हा सुर्योदयाची प्रतीक्षा करणे गरजेचे असते . या न्यायाने कमी अधिक अडचणींना सामोरे जात न्यु सातारा समुहाने या नंतर न्य़ सातारा कॉलेज ऑफ इंजिनिअरींग न्यु सातारा आय टी आय यांची स्थापना केली व आजमितीस या तिन्ही दालनातुन प्रत्येक वर्षी अनेक विद्यार्थी महाराष्ट्रातील अनेक नामवंत कंपन्यामध्ये उच्च पदावर कार्यरत आहेत . यातुन संस्थेचा परिणामी अखंड महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास आहे .


सर्व विश्‍वस्त मंडळ आपले कामकाज पाहुन संस्थेचा कारभार काळजीपुर्वक पहातात त्यांचे मनपुर्वक आभार संस्थेचे अधिकारी शेक्षीणिक दालनात काम करणारे प्राचार्य शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांचे अथक परिश्रम आहेत त्यांचेही आभार व्यक्‍त करतो .

आपण सर्वजण संस्थेवर विश्‍वास ठेवुन संस्थेच हित साधत आहात आपणा सर्वांच क्रण व्यक्‍त करतो .

पुन्हा एकदा आपणा सर्वांचे मनपुर्वक आभार

धन्यवाद

जय हिंद जय महाराष्ट्र जय सहकार

आपलाच

श्री - राजाराम नाना म. निकम

संस्थापक अध्यक्ष न्यु सातारा समुह